दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जून-जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जून-जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वीची पुरवणी परीक्षा २४ जून २०२५ ते ०८ जुलै २०२५ या कालावधीत, तर १२ वीची पुरवणी परीक्षा २४ जून २०२५ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळेः

  1. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षाः

    https://www.mahahsscboard.in आणि http://hscresult.mkcl.org

  2. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षाः

    https://www.mahahsscboard.in आणि http://sscresult.mkcl.org

पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियाः

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन दिवसांत अर्ज करणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in