महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता, कसा पाहाल तुमचा निकाल ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२वीचा (Maharashtra Board Class 12th result) निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
File Photo
File PhotoANI

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२वीचा (Maharashtra Board Class 12th result) निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर तपासता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२२ तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. महाराष्ट्र बोर्डाच्या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत इयत्ता १२ वीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यंदा बारावीसाठी १४ लाख २५ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते.

महाराष्ट्र बोर्ड HSC चा निकाल २०२२ कसा तपासायचा?

mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावर, HSC निकाल २०२२ लिंकवर क्लिक करा.

रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील भरा.

'सबमिट' बटणावर क्लिक करा.

तुमचा निकाल प्रदर्शित होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in