Maharashtra Budget 2023-2024 Live : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३

Maharashtra Budget 2023-2024 Live : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३

संपूर्ण अपडेट एका क्लिकवर

राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी तर सांगली नाट्यगृहासाठी २५ कोटींची तरतूद

भिडे वाड्यात उभारण्यात येणार सावित्रीबाई फुले यांचे स्मारक; केली ५० कोटींची तरतूद

काजू फळ विकास योजनेसाठी ५ वर्षांसाठी १३२५ कोटींची तरतूद

धनगर समाजाला एक हजार कोटी रुपये, तर महामंडळामार्फत १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार

आता महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फक्त १ रुपयांत मिळणार पीकविमा

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटींचा निधी

राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम लवकरच होणार

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन मिळणार, सरासरी 10 हजारांची वाढ

अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळणार 

राज्यातील 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी 400 कोटीची तरतूद

महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम पहिल्या टप्प्यात, राज्य सरकारकडून ३५१ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई, एमएमआर, ठाणे येथील प्रवाशांच्या सोयीला अधिक प्राधान्य

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते टिकाऊ व्हावेत यासाठी सिमेंट काँक्रीट आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार

समृद्धी महामार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण. नागपूर-शिर्डीचे लोकार्पण झाले, या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजापासून शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधला जाणार

महाराष्ट्रातील शक्तीपीठे, दोन ज्योतिर्लिंगे, पंढरपूर अशी तीर्थक्षेत्रे जोडली जाणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या मार्गावरील कामाला मान्यता देऊन काम सुरु

आरोग्य विभागासाठी ३ हजार ५२० कोटींची तरतूद करणार

प्रत्येक महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा क्षेत्र स्थापन केलं जाणार

गुढी पाडवा बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १ कोटी ६३ लाखहून अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार 

राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना सरसकट ५० टक्के सूट मिळणार

अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ

शहरी भागात नोकरीसाठी घर सोडून राहणाऱ्या महिलांसाठी नवीन ५० वसतीगृहे तयार करण्यात येणार 

मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, चौथीत ४ हजार, सहावीत ६ हजार, आठवीत ८ हजार रुपये १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना : कोकणासाठी 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह काजू बोर्ड

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण ; दीड लाख शेतकऱ्यांना सौरकृषीपंप लावून दिले जाणार 

कृषी विभागाला कार्यक्रम खर्चासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी, अन्न व नागरी पुरवठा विभागास ४९१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार 

नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावे यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा केला जाणार 

मच्छीमारांच्या कल्याणासाठी प्रकल्पाच्या दोन टक्के किंवा ५० कोटींचा मच्छीमार विकास निधी स्थापन करणार

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत

मागेल त्याला शेततळे यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र ;  १ हजार कोटींची तरतूद

अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचं देण्यात येणार

मधल्या काळात लाभ न मिळालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरीत पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येणार 

१ – शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी २- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास ३ – भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास ४ – रोजगार हमीतून विकास ५ – पर्यावरणपूरक विकास या पाच ध्येयांवर आधारीत पंचामृत अर्थसंकल्प

किल्ले संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये

भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियनचा वाटा महाराष्ट्राचा असावा- फडणवीस 

संत तुकोबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईची विरोधकांकडून मागणी 

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात दाखल

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in