विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावून धरली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
एक्स @iambadasdanve
Published on

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावून धरली. मात्र, दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा शोक प्रस्ताव मांडायचा असून उद्या चर्चा करू. असे सांगत विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृह मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

१९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती, तर शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थागितीवर सुनावणी लांबणीवर पडली आहे, तर दुसरीकडे विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

विधानभवन परिसरात मविआ नेत्यांची घोषणाबाजी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ नेत्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

logo
marathi.freepressjournal.in