Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार गटाला मंत्रीपदं मिळणार ; घटस्थापनेनंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता

आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे तसंच केंद्रात एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार गटाला मंत्रीपदं मिळणार ; घटस्थापनेनंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता

मागील काही दिवसांपासून राज्यात चर्तेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. घटस्थापनेनंतर हा विस्तार होणार असल्याची सांगितलं जात आहे. यावेळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांना आणखी संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे तसंच केंद्रात एक कॅबिनेट पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्ही या वृत्तवाहिनीने यासंबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

सत्तेत सामील होताच अजित पवार गटाच्या ९ आमदारांना मलाईदार खात्यांची मंत्रीपदे मिळाली. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार मात्र अजूनही चातकाप्रमाणे मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. साष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रपदावर पाणी पेरले जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. असं असताना आता पुन्हा राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून त्यात देखील अजित पवार गटालासंधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आगामी मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपदं, आणि राज्यमंत्री पदं मिळाल्यानंतर शिंदे गटात पुन्हा एकादा नाराजी पसरण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाकूडन सातत्याने नाराजीचा सूर निघत आहे. दिवसेंदिवस शिंदे गटातील अस्वस्थता वाढच चालली असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in