
राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा अखेर आज पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्राला आजपासून १८ नवीन मंत्री मिळाले आहेत. राजभवन दरबारमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रिमंडळामध्ये भाजपच्या ९ जणांचा सहभाग असून शिंदे गटामधील देखील ९ जणांचा शपथविधी पार पडला.
शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदिपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
भाजपचे मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगल प्रभात लोढा