Winter : राज्यात थंडीचे आगमन; मुंबईमध्ये किमान तापमान २० अंशाखाली

राज्यात कमाल तापमानात घट झाल्यामुळे थंडीमध्ये (Winter) वाढ झाली आहे. मुंबईमध्ये अखेर यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.
Winter : राज्यात थंडीचे आगमन; मुंबईमध्ये किमान तापमान २० अंशाखाली

गेल्या काही आठवड्यांमध्ये गर्मीचा मारा सहन केल्यानंतर अखेर राज्यात थंडीचे (Winter) आगमन झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबईमध्ये यावर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील कुलाबा येथे किमान तापमान २० अंशाखाली गेले आहे. तर, इतर जिल्ह्यांमध्येही तापमानात घट झाल्याने थंडीचा तडाखा अनुभवायला मिळतो आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये यंदाच्या हिवाळ्यामधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच, येणाऱ्या दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाजदेखील त्यांनी वर्तविला आहे. तसेच, धुळे जिल्ह्यामध्ये तापमान १० अंशांखाली गेले आहे. काल ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद धुळ्यामध्ये करण्यात आली. तर, परभणीमध्ये सुद्धा तापमान १० अंशांपर्यंत गेले आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामध्येही तापमानात घट झाली. त्यामुळे आता ग्रामीण भागांसह शहरी भागांमध्येही शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in