Balasaheb Thorat : नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेस हायकमांडकडून हालचालींना वेग

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये झालेल्या बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या वादाची दखल आता काँग्रेस हाय कमांडने घेतली असून हालचालींना वेग
Balasaheb Thorat : नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेस हायकमांडकडून हालचालींना वेग
Published on

महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून बाळासाहेब थोरातांच्या तक्रारीची दखल घेत नाना पटोलेंचे अध्यक्षपद जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे मुंबईत दाखल होणार असून ते काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबतच बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत.

सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. तांबे यांच्या बंडखोरीनंतर नाना पटोले यांनी सत्यजित व त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. नगरमधील काँग्रेस तसेच भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित यांचा प्रचार केला होता. सत्यजित विजयी झाले. यानंतर पटोले-थोरात वाद विकोपाला गेला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आहेत. विधिमंडळाचे ते गेल्या ४० वर्षांपासून सदस्य आहेत. सध्या त्यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ नेतेपद आहे. इतके ज्येष्ठ असूनही आपला मान राखला जात नसल्याचे सांगत थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट हायकमांडकडे सोपविला. विजय वडेट्टीवार, आशिष देशमुख, सुनील केदार यांनी पटोलेंवर नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरातांच्या तक्रारीची गंभीर दखल आता हायकांनाडने घेतल्याचे दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in