विधानसभा निवडणुकीचे पडघम! उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा, विदर्भ दौरा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रत्येक पक्षाने आपल्या मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम! उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा, विदर्भ दौरा
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रत्येक पक्षाने आपल्या मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाने रणनीती आखली असून १० ऑगस्टपासून मराठवाडा, विदर्भात दौरे आयोजित केले आहेत.

काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला या दौऱ्यात जिल्हानिहाय बैठका घेऊन तेथील मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. तर मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, ११ ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. १३ ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा, अकोला आणि वाशिम, १४ ऑगस्ट रोजी अमरावती, यवतमाळ जिल्हयाची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, असे सांगण्यात आले.

असा असेल दौरा

१० ऑगस्ट - लातूर, धाराशीव, बीड

११ ऑगस्ट - नांदेड, परभणी आणि हिंगोली

१२ ऑगस्ट - छत्रपती संभाजीनगर, जालना

१३ ऑगस्ट - बुलढाणा, अकोला, वाशिम

१४ ऑगस्ट रोजी अमरावती, यवतमाळ

logo
marathi.freepressjournal.in