काँग्रेसचाही प्रस्थापितांवर भर! ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पृथ्वीराज चव्हाण, पटोले, थोरात, वडेट्टीवार रिंगणात

जागावाटपाचा तिढा ताणला गेल्याने काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली होती. अखेर उशिरा का होईना, पण काँग्रेसने आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी रात्री जाहीर केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : जागावाटपाचा तिढा ताणला गेल्याने काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली होती. अखेर उशिरा का होईना, पण काँग्रेसने आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. काँग्रेसनेही प्रस्थापितांवर भर दिला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र अमित आणि धीरज तसेच यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, नितीन राऊत या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार आहेत. लातूर शहरमधून अमित देशमुख तसेच लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मुंबईच्या धारावी मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय चुनाव समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कसबा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. पुण्यातून सध्या काँग्रेसकडून एकमेव उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

काँग्रेसची पहिली यादी

ॲॅड. के.सी. पाडवी (अक्कलकुवा)

राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (शहादा)

किरण दामोदर तडवी (नंदुरबार)

श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (नावापूर)

प्रवीण बापू चौरे (साक्री)

कुणाल रोहिदास पाटील (धुळे ग्रामीण)

ॲॅड. धनंजय शिरीष चौधरी (रावेर)

राजेश पंडितराव एकाडे (मलकापूर)

राहुल सिद्धिविनायक बोंद्रे (चिखली)

अमित सुभाषराव झनक (रिसोड)

प्रा. वीरेंद्र वाल्मिकराव जगताप (धामणगाव रेल्वे)

डॉ. सुनील देशमुख (अमरावती)

ॲॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (तिवसा)

अनिरुद्ध सुभानराव देशमुख (अचलपूर)

रणजीत प्रताप कांबळे (देवळी:

प्रफुल विनोदराव गुडधे (नागपूर दक्षिण पश्चिम)

बंटी बाबा शेळके (नागपूर मध्यवर्ती)

विकास पी. ठाकरे (नागपूर पश्चिम)

डॉ. नितीन काशिनाथ राऊत (नागपूर उत्तर)

नानाभाऊ फाल्गुनराव पटोले (साकोली)

गोपालदास शंकरलाल अग्रवाल (गोंदिया)

सुभाष रामचंद्रराव धोटे (राजुरा)

विजय नामदेवराव वडेट्टीवार (ब्रह्मपुरी)

सतीश मनोहरराव वारजूकर (चिमूर)

माधवराव निवृत्तीराव पवार पाटील (हदगाव)

तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर (भोकर)

मीनल निरंजन पाटील-खतगावकर (नायगाव)

सुरेश अंबादास वरपुडकर (पाथरी)

विलास केशवराव औताडे (फुलंब्री)

सय्यद मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर)

अस्लम आर. शेख (मालाड पश्चिम)

मोहम्मद आरिफ नसीम खान (चांदिवली)

डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (धारावी)

अमीन अमीराली पटेल (मुंबादेवी)

संजय चंद्रकांत जगताप (पुरंदर)

संग्राम अनंतराव थोपटे (भोर)

रवींद्र हेमराज धंगेकर (कसबा पेठ)

विजय बाळासाहेब थोरात (संगमनेर)

प्रभावती जे. घोगरे (शिर्डी)

धीरज विलासराव देशमुख (लातूर ग्रामीण)

अमित विलासराव देशमुख (लातूर शहर)

सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे (अक्कलकोट)

पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण)

रुतुराज संजय पाटील (कोल्हापूर दक्षिण)

राहुल पांडुरंग पाटील (करवीर)

राजू जयंतराव आवळे (हातकणंगले)

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम (पलूस-कडेगाव)

विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (जत)

logo
marathi.freepressjournal.in