कंत्राटदारांचे आज राज्यव्यापी आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

राज्य सरकारच्या विविध विभागातील विकासकामे मार्गी लावणाऱ्या कंत्राटदारांनी ९० हजार कोटींची थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे.
कंत्राटदारांचे आज राज्यव्यापी आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Published on

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील विकासकामे मार्गी लावणाऱ्या कंत्राटदारांनी ९० हजार कोटींची थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी तीन लाखांहून अधिक कंत्राटदार राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे हाती घेत ती मार्गी लावली किंवा काही कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र ९० हजार कोटींच्या बिलाची रक्कम देण्यात राज्य सरकारकडून चालढकल केली जात आहे. पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अखेर थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्यभरातील तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांनी ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हॉट मिक्स असोसिएशन, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन, सोलापूर महापालिका कंत्राटदार असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी वित्तमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in