थकीत देयकांवरून कंत्राटदारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारच्या विविध विभागांतील विकासकामे मार्गी लावल्यानंतर देयकाची रक्कम मिळवण्यासाठी कंत्राटदारांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहेत.
थकीत देयकांवरून कंत्राटदारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
थकीत देयकांवरून कंत्राटदारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागांतील विकासकामे मार्गी लावल्यानंतर देयकाची रक्कम मिळवण्यासाठी कंत्राटदारांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहेत. तरीही देयकाची रक्कम मिळत नसल्याने काही कंत्राटदारांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र, राज्य सरकारकडून कंत्राटदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकारच्या हुकूमशाहीविरोधात कंत्राटदारांमध्ये रोष पसरला असून येत्या १९ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीमोल्लंघन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन

राज्य सरकारच्या हुकूमशाही, दडपशाही, दादागिरी धोरणांविरोधात राज्यातील सर्व कंत्राटदारांनी सोमवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे सीमोल्लंघन होणार आहे, असा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in