न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे.
न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल
न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल
Published on: 

मुंबई : ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अधिक तपास सुरू आहे. सायबर पोलिसांकडूनही ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

ठाणे जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीचा ई-मेल सोमवारी प्राप्त झाली. त्यानुसार, २७ नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री ९.११ वाजता बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. सन १९८४ मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये केला आहे.

आपण दिलजीत दोसांझ याचा साथीदार असल्याचा उल्लेख करत, २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली आहे. मराठी बांधवांनो, आपल्या मुलांना वाचवा, २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवले जातील, अशा आशयाचा मजकूर मेलमध्ये आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)