क्यूआर कोड, एआय व्हॉईस, बनावट ॲप्सपासून सावध राहा; महाराष्ट्र सायबर पोलिसांचे मुंबईकरांना आवाहन

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी घोटाळ्यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे.
क्यूआर कोड, एआय व्हॉईस, बनावट ॲप्सपासून सावध राहा; महाराष्ट्र सायबर पोलिसांचे मुंबईकरांना आवाहन
क्यूआर कोड, एआय व्हॉईस, बनावट ॲप्सपासून सावध राहा; महाराष्ट्र सायबर पोलिसांचे मुंबईकरांना आवाहन'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

सोमेंद्र शर्मा/मुंबई

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी घोटाळ्यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागरिकांनी अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नयेत आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळावे, कारण यामुळे घोटाळेबाज नागरिकांचा डेटा चोरी करू शकतात. उपकरणांमधील ॲप्स अपडेट ठेवणे तसेच ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर न करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. ‘क्यूआर कोड कुठे लावण्यात आला आहे हे तपासा आणि संशयास्पद चिन्हे पाहा. अनोळखी स्रोतांशी आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. विश्वासू ॲप्सचा वापर करा आणि शक्य तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा. कोणतीही माहिती प्रविष्ट करण्यापूर्वी यूआरएलची खात्री करा,’ असे पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

भामटे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पीडित व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तीचा (जसे की बॉस, मित्र किंवा नातेवाईक) आवाज क्लोन करतात. त्यानंतर आणीबाणी किंवा व्यवहाराचे कारण सांगून तातडीने पैशांची मागणी केली जाते.

काय करावे, काय करू नये!

बनावट सरकारी ॲप्सबाबत जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबईकरांना सरकारी ॲप्स, लिंक्स किंवा पीडीएफच्या नावाने बनावट एपीके फाइल्सचे मेसेज पाठवले जातात. नेहमीच्या सुरक्षेला चकवा देऊन हानिकारक ॲप्स उपकरणात डाऊनलोड करण्यासाठी ही युक्ती वापरली जाते. एकदा या एपीके फाइलवर क्लिक केल्यास, फसवणूक करणाऱ्याला फोनमधील एसएमएस आणि ओटीपीचा ॲॅक्सेस मिळतो. यामुळे बँक, यूपीआय, कार्ड किंवा वॉलेटमधून थेट पैसे काढले जातात तसेच व्हॉट्सॲॅपवरील ऑटो-फॉरवर्डद्वारे संपर्कांना संदेश पाठवून अधिकृत नसलेले व्यवहार केले जातात. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी एपीके किंवा लिंक्सवर क्लिक करणे टाळावे आणि अधिकृत ॲप्स सरकारी संकेतस्थळांवरूनच तपासावेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in