३२ पोलिसांना सन्मानचिन्ह; महाराष्ट्र दिनी होणार गौरव, पोलीस दलात उत्साहाचे वातावरण

पोलीस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली.
३२ पोलिसांना सन्मानचिन्ह; महाराष्ट्र दिनी होणार गौरव, पोलीस दलात उत्साहाचे वातावरण
Published on

छत्रपती संभाजीनगर : पोलीस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातून एकूण ८०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप अनंत आटोळे, लोहमार्गच्या अधीक्षक स्वाती रामराव भोर यांचा समावेश आहे.

शहर पोलीस दलातून यासाठी यंदा ३५ अधिकारी व अंमलदारांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच २१ अधिकारी व अंमलदारांना हा सन्मान जाहीर झाला. राज्यात गडचिरोली, मुंबई शहरानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाला सर्वाधिक पदके जाहीर झाली आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या पदक, सन्मानचिन्हाने सर्वांना गौरवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संदीप आटोळे, स्वाती भोर, गीता बागवडे, अशोक भंडारे, शरद जोगदंड, दीपक परदेशी, इसाक पठाण,शकिल शेख,गफ्फार खान,नारायण राठोड,पोलीस निरीक्षक गीता मोतीचंद बागवडे, अशोक रामलू भंडारे (शहर पोलीस), शरद बाबूराव जोगदंड (लोहमार्ग पोलीस),अंमलदार (शहर पोलीस) राजेंद्र देविदास चौधरी, सुनील सुरेश बेलकर, मुश्ताक गफूर शेख, मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव, विठ्ठल विनायक मानकापे, दरखशा इल्तेजा रिजवान शेख, संतोष गंगाराम लोंढे, शिवाजी राजाराम कचरे, बाळासाहेब जयसिंग आंधळे, प्रभाकर साहेबराव राऊत, लक्ष्मण दशरथ कीर्तीकर यांचा समावेश आहे.

उपनिरीक्षक दीपक सुगनसिंग परदेशी, इसाक उस्मानखान पठाण, मनोहर नरहरी बुरूड, शेख हबीब खान मोहम्मद, सहायक उपनिरीक्षक संजय जोगदंड, विष्णू लक्ष्मण उगले यांच्यासह उपनिरीक्षक नारायण भगवान राठोड, गफ्फार खान सरवर खान पठाण, अंमलदार अफसर खाजा शेख, राजू वामन खरात या जिल्हा पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in