पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ

राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ

मुंबई : राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. शुक्ला या जून २०२४ मध्ये निवृत्त होणार होत्या. आता त्यांना २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

शुक्ला यांनी आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांच्याकडून पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतली. शुक्ला यांची ४ जानेवारी २०२४ रोजी चार महिन्यांसाठी पोलीस महासंचालकपदासाठी नियुक्ती झाली. तत्पूर्वी त्या सशस्त्र सीमा बलात प्रतिनियुक्तीवर होत्या. त्यांच्याविरोधातील तीन गुन्हे मुंबई हायकोर्टाने रद्दबातल ठरवले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकाश सिंग यांच्या निकालाचा हवाला देऊन राज्य पोलीस प्रमुखांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली. गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, “पोलीस प्रमुखांना राजकीय दबाव येऊ नयेत, याची खात्री करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, पोलीस अधिकारी निवृत्त झाला नसल्यास त्याला दोन वर्षांची मुदतवाढ देता येते, त्याचाही आधार घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in