अमली पदार्थांच्या विळख्यात महाराष्ट्र! ५ महिन्यांत तब्बल 'इतके' ड्रग्ज जप्त, ६.५ हजारांहून अधिक कारवाया; ६ पोलीस बडतर्फ

राज्यात अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढले असून, अमली पदार्थांच्या विळख्यात राज्य सापडले आहे.
अमली पदार्थांच्या विळख्यात महाराष्ट्र! ५ महिन्यांत तब्बल 'इतके' ड्रग्ज जप्त, ६.५ हजारांहून अधिक कारवाया; ६ पोलीस बडतर्फ
Published on

मुंबई : राज्यात अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढले असून, अमली पदार्थांच्या विळख्यात राज्य सापडले आहे. गेल्या पाच महिन्यांत चार हजार १३१ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकांनी राज्यात केलेल्या कारवाईत ६ हजार ५२९ ठिकाणी छापे टाकले. या टाकलेल्या छाप्यादरम्यान ड्रग्ज माफियांशी हितसंबंध असलेल्या सहा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत भाई जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुंबईसह राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या घटनांकडे लक्ष वेधले. सरकारने अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या. याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली. फडणवीस यांनी यावर उत्तर दिले.

राज्यात अमली पदार्थांचे मोठे आव्हान उभे असून, चिंतेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना 'संयुक्त कृती आराखडा' सादर केला. अमली पदार्थांचा काळा कारभार देशभरात सुरू आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुरिअरमार्फत, इन्स्टाग्राम, फेसबुक चॅट किंवा अन्य मॅसेंजरच्या माध्यमातून विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणारी विक्रीही मोठे आव्हान बनले आहे.

बंदरांवर ड्रग्ज स्कॅनर

राज्य अमली पदार्थांचे समूळ नायनाट करण्याचे धोरण राबवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. सर्वांची एकत्रित बैठक घेऊन, सविस्तर अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा, अशी सक्ती केली आहे. समुद्रकिनाऱ्याची बंदरे असो किंवा अन्य ठिकाणीच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी डॅग्ज स्कॅनर लावले आहेत. त्यामुळे कोणत्या कंटेनरमध्ये कुठलाही अमली पदार्थ शोधण्यास मदत होणार आहे तसेच तंत्रज्ञानाद्वारे नवीन विक्रीचे अड्डे कशा प्रकारे संपवता येतील, यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in