'ई-फेरफार'द्वारे होणार आता पीक पाहणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाइन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता 'ई-फेरफार'द्वारे पीक पाहणी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.
'ई-फेरफार'द्वारे होणार आता पीक पाहणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
'ई-फेरफार'द्वारे होणार आता पीक पाहणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाइन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता 'ई-फेरफार'द्वारे पीक पाहणी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी आग्रही भूमिका घेतली होती. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले.

केंद्राच्या 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' मोबाईल ॲपमध्ये शेतातील गटांचे अंतर अधिक दर्शवणे, गावांचे नकाशे परस्पर बदलणे, गट क्रमांक उपलब्ध नसणे यांसारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत.