राज्यात आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना; मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन व गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तचर युनिट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तचर युनिट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले होते की, आर्थिक गुप्तचर युनिट हे विशेष युनिट आर्थिक फसवणूक आणि संगठित आर्थिक गुन्ह्यांची माहिती गोळा करून विश्लेषण करेल आणि संबंधित यंत्रणांपर्यंत ती पोहोचवली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवले जाणार आहे. त्यांना २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ८ पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य मिळणार आहे.

असे असणार युनिटचे काम

- आर्थिक गुन्ह्यांची माहिती संकलन व विश्लेषण करणे

- बँक घोटाळ्यांवर नजर

- गुप्तचर यंत्रणांच्या सहाय्याने आर्थिक गुन्हेगारी नेटवर्क शोधणे

logo
marathi.freepressjournal.in