

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून आगामी निवडणुकीत ४० स्टार प्रचारक आपल्या पक्षाचा प्रचाराची धुरा संभाळणार आहेत. तसेच स्टार प्रचारकाची यादी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे यादी सादर करा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना केले आहे.
राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत केली होती. तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. पक्षांना प्रचारकांची यादी संबंधित स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे सादर करावी लागेल.