दुबार मतदारांचा शोध घेऊन दक्षता घ्या; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

मनपा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात तसेच दुबार मतदारांसाबत राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमाने बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी दिनेश वाघमारे म्हणाले की...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीतील संशयित दुबार मतदारांची फेरपडताळणी करा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी; असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिले.

मनपा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात तसेच दुबार मतदारांसाबत राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमाने बैठक घेण्यात आली. त्यावेळी दिनेश वाघमारे म्हणाले की, “प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे.”

logo
marathi.freepressjournal.in