राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

भाजपच्या दोन माजी खासदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि त्यांना तत्काळ उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : भाजपच्या दोन माजी खासदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि त्यांना तत्काळ उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची ७ उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात आयारामांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार पक्षाची ३८ जणांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी ७ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये वांद्रे पूर्व येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई विरूद्ध झिशान सिद्दीकी असा सामना रंगणार आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सात जणांच्या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली तासगाव आहे.

सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शुक्रवारी सकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांचा पराभव केला होता. ते आता विधानसभा मतदारसंघातून कट्टर विरोधक दिवंगत आर. आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील

इस्लामपूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने भाजपचे नेते निशिकांत पाटील हे अजित पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा लढणार आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी दोन हात करतील.

अणुशक्तीनगर- सना मलिक शेख

इस्लामपूर - निशिकांत पाटील

तासगाव कवठेमहांकाळ - संजयकाका पाटील

वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी

वडगाव शेरी - सुनिल टिंगरे

शिरूर - ज्ञानेश्वर कटके

लोहा - प्रताप पाटील चिखलीकर

logo
marathi.freepressjournal.in