

मुंबई : महाराष्ट्र सरकारने फक्त इलेक्ट्रिक बाईक्सनाच बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देणारा जीआर जारी केल्यानंतर हजारो रायडर्स एका रात्रीत बेरोजगार झाले आहेत. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आवश्यक पायाभूत सुविधा, अनुदाने आणि शासकीय मदत नसताना रायडर्स आणि लाखो प्रवासी अडचणीत आले आहेत.
बाईक टॅक्सी असोसिएशन (बीटीए)ने या जीआरला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, हा निर्णय अन्यायकारक असून असोसिएशनने स्पष्ट केले की, त्यांना ई-व्ही तंत्रज्ञानाचा किंवा बदलाचा विरोध नाही; मात्र,इंजिन बाईक्सना इलेक्ट्रिक वेहिकल (EV) बाईक मध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य कालावधी, आर्थिक मदत आणि मूलभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. त्यामुळे ICE (इंजिन) वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्यासाठी किमान एक वर्षाचा संक्रमण कालावधी द्यावा, अशी मागणी बाईक टॅक्सी असोसिएशनचे प्रेसिडेंट अमित गावडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.