संगमनेर : नुकसान अन् चिंतेशिवाय हातात काहीच नाही; कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत करपतेय...

पावसाने पाठ फिरविल्याने राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे.
संगमनेर : नुकसान अन् चिंतेशिवाय हातात काहीच नाही; कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत करपतेय...
संगमनेर : नुकसान अन् चिंतेशिवाय हातात काहीच नाही; कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत करपतेय... (Photo-X)
Published on: 

चौधरवाडी/ संगमनेर : पावसाने पाठ फिरविल्याने राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपून जात आहे. शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात आज उत्पन्नाऐवजी नुकसान आणि चिंतेशिवाय काहीच उरलेले नाही.

साकुर पठार भागातील चौधरवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कष्टाने फुलवलेली पिके वाळून जाताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा मन हेलावून टाकणारी आहे.

शासनाने नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी

शासनाने पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी. शेतकऱ्यांना केवळ धीर देऊन चालणार नाही, तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी शासनदरबारी ठामपणे आवाज उठवत राहणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

संकट शेतकऱ्यांवर, जबाबदारी सरकारचीच

दुष्काळाचl संकट शेतकऱ्यांच्या दारात उभl असताना मदतीसाठी त्यांना सरकारी प्रक्रियांच्या फेऱ्यांत अडकवून चालणार नाही. दुष्काळ जाहीर झाला, मग प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार? संकट शेतकऱ्यांवर आहे, त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in