नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदत; मत्स्यबीज शेतीसाठी प्रती हेक्टर १० हजार

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषाच्या धर्तीवर द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित करण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदत; मत्स्यबीज शेतीसाठी प्रती हेक्टर १० हजार | प्रातिनिधिक छायाचित्र
नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदत; मत्स्यबीज शेतीसाठी प्रती हेक्टर १० हजार | प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांसह मत्स्य व्यवसायालाही फटका बसला आहे. शेतकऱ्याप्रमाणे मत्स्य व्यवसायिकांना आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारने निकष जारी केले आहेत. यात मत्स्यबीज शेतीसाठी प्रती हेक्टर १० हजार रुपये, बोटींची अंशतः दुरुस्तीसाठी ६ हजार रुपये मिळणार आहेत. याबाबत बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली होती. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका व जाळी यांचे नुकसान झाले आहे. याच बरोबर मत्स्यबीज केंद्राचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषाच्या धर्तीवर द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित करण्यात आले आहेत.

एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणार मदत

  • बोटी - ६ हजार रुपये (बोटींची अंशतः दुरुस्ती)

  • जाळी - १५,००० रुपये (पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी)

  • अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी ३ हजार

  • पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी ४ हजार रुपये

  • मत्स्यबीज शेतीसाठी निविष्ठा १० हजार रुपये प्रति हेक्टर

logo
marathi.freepressjournal.in