Municipal Corporation Elections : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; लगेच ४ दिवस ‘ड्राय डे’ लागू होणार, राज्य सरकारचा निर्णय

बार, परमिट रूम्स तसेच मद्यविक्री करणारी सर्व आस्थापनेही बंद ठेवण्यात येतील. नागरिक, मतदार आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास...
Municipal Corporation Elections : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; लगेच ४ दिवस ‘ड्राय डे’ लागू होणार, राज्य सरकारचा निर्णय
Published on

मुंबई : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने १३ ते १६ जानेवारी या चार दिवसांचा ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे. मतदान होणाऱ्या २९ महापालिका क्षेत्रांमध्ये या कालावधीत मद्याची विक्री, खरेदी आणि सेवन पूर्णतः बंद राहणार आहे.

प्रचाराची मुदत संपताच ड्राय डे लागू

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, शांततेत प्रचार व मतदान प्रक्रिया पार पाडणे आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. १३ जानेवारीला प्रचाराची मुदत संपताच (जाहीर सभा, रॅली आदी बंद झाल्यानंतर) ड्राय डे लागू होईल. म्हणजे मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून पुढील चार दिवस राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात 'ड्राय डे' असणार आहे.

बार, परमिट रूम्सही बंद; उल्लंघन केल्यास कारवाई

या चार दिवसांत संबंधित महापालिका हद्दीत दारूची दुकाने, बार, परमिट रूम्स तसेच मद्यविक्री करणारी सर्व आस्थापने बंद ठेवण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लागू कायद्यांनुसार कडक कारवाई व दंडात्मक शिक्षा केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिक, मतदार आणि व्यावसायिकांनी या निर्बंधांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ड्राय डे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे.”

logo
marathi.freepressjournal.in