शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० असावे; महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे ही अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे ही अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनातील चतुर्थश्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. केंद्र शासनात तसेच घटक राज्यांमध्ये सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. महाराष्ट्र राज्यात निवृत्ती वय ५८ वर्षे असणे ही बाब अत्यंत अव्यवहार्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

रिक्त जागांवर भरती करावी

सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण ७.१९ लाख मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील २.७५ लाख म्हणजेच ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यात दरवर्षी सेवा निवृत्तीने रिक्त होणाऱ्या ३ टक्के जागांची भर पडत आहे. या रिक्त जागांवर नवोदितांची रितसर भरती करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महासंघाची आहे.

logo
marathi.freepressjournal.in