जर्मनी-महाराष्ट्राच्या संबंधांचा विस्तार होणार; जर्मनीचे वाणिज्यदूत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहीत केले जात आहे. जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार योग्य ते सहकार्य करणार आहे.
(फोटो - X/@AjitPawarSpeaks)
(फोटो - X/@AjitPawarSpeaks)
Published on

मुंबई : महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहीत केले जात आहे. जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार योग्य ते सहकार्य करणार आहे.

महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीत रोजगाराच्या संधी वाढवणे यासाठी जर्मनीचे वाणिज्यदूत ख्रिस्तोफ हॅलियर व जर्मनीचे उप वाणिज्यदूत ख्रिस्तोफ रेंडटॉर्फ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र–जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र–बॅडन वुर्टेम्बर्ग भागीदारी, कौशल्य स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती, तसेच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या सहकार्यामुळे महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य वृद्धी, रोजगार निर्मिती व विदेशी गुंतवणूक लाभेल, तर जर्मनीला विश्वासार्ह भागीदारी व नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक

येत्या काळात महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जा, शाश्वत गतिशीलता, स्मार्ट सिटी, संशोधन व स्टार्टअप इकोसिस्टीम, उच्च शिक्षण देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संबंध विस्तार या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र–जर्मनी संयुक्त संचालन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले.

logo
marathi.freepressjournal.in