

मुंबई : मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर क्षेत्रातील मेट्रो रेल्वे स्थानकांची नावे निश्चित करण्यासाठी तसेच नामांतर आवश्यकतेनुसार करण्याबाबत केंद्र सरकारला शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समितीचे सह-अध्यक्ष असतील.
नगरविकास विभागाने १८ निर्णयानुसार, नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन ठरवताना स्थानकांची नावे त्या परिसराचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व, स्थानिक नागरिकांच्या भावना तसेच वाद टाळण्याची आवश्यकता विचारात घेण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. संबंधित भागातील लोकसभा खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापौर किंवा अध्यक्ष हे समितीचे अन्य सदस्य असतील. मेट्रो प्रकल्प राबविणाऱ्या संस्थेचे प्रशासकीय प्रमुख सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
नामांतराच्या प्रस्तावांची छाननी
केंद्राच्या मेट्रो रेल्वे स्थानक नामकरण नियम, २०२६ नुसार समिती काम करणार आहे. स्थानकांच्या नावांमध्ये समानता किंवा उच्चारातील साम्यामुळे गोंधळ होऊ नये, नेते किंवा देवतांच्या प्रतीकात्मक प्रतिनिधित्वातून वाद निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली जाणार आहे. मेट्रो व्यवस्थापनाकडे आलेल्या नामकरण किंवा नामांतराच्या प्रस्तावांची प्रथम छाननी केली जाईल. त्यानंतर राज्य नगरविकास विभाग हे प्रस्ताव समितीसमोर ठेवील. समितीच्या शिफारशी अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येतील.