केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी नि:शुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला.
केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय
केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी नि:शुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी याच निर्णयाने जागा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता राज्यात केंद्रीय विद्यालये उभारण्याला गती मिळणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रस्ताव दिला. त्यावरून शासकीय भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किमतीने कब्जेहक्काने व भोगवटादार वर्ग दोन या धारणाधिकाराने हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथील स. नंबर ९३ मधील १० हेक्टर ३० गुंठे क्षेत्रापैकी २ हेक्टर ५० गुंठे जमीन केंद्रीय शाळेसाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा केंद्रीय विद्यालय संघटन, नवी दिल्ली यांना धारणाधिकाराने देण्यात येणार आहे.

राज्यासाठी धोरणात्मक निर्णय

केंद्रीय विद्यालय संघटन, नवी दिल्ली यांनी ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन विद्यालये सुरू करण्यासाठी रितसर मान्यता दिली आहे किंवा भविष्यात देणार आहेत, अशा सर्व प्रस्तावांना आता गती मिळणार आहे. अशा प्रस्तावांमध्ये शासकीय जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने आणि विनामूल्य तत्त्वावर हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात केंद्रीय विद्यालयांसाठी जमिनीचे प्रस्ताव शासन स्तरावर आल्यास त्याला तातडीने मंजुरी मिळणे सोपे होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in