राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

मुंबईसह राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत असून अनेक जिल्ह्यांतील पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक आजार बळावले आहेत. खानदेशात जळगाव, नाशिक तसेच उत्तर कोकणात पालघरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण | संग्रहित छायाचित्र
राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण | संग्रहित छायाचित्रदीपक कुरकुंडे
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत असून अनेक जिल्ह्यांतील पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक आजार बळावले आहेत. खानदेशात जळगाव, नाशिक तसेच उत्तर कोकणात पालघरमध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरात आतापर्यंत उष्णतेच्या लाटेचा त्रास झालेल्या दोन लाख ५० हजार ८३२ जणांची तपासणी करण्यात आली. यात मुंबईत ५१ हजार ८२६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, पालघर, रायगड जळगाव, नाशिक जिल्ह्यात पाच जणांना उष्मघाताचा त्रास झाल्याचे राज्य सरकारच्या एकात्मिक आरोग्य माहिती प्रणाली विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले तर ते उन्हामध्ये सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. आराखड्यानुसार विविध उपाययोजना केल्या जातात.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर राज्यातील तापमानात वाढ होत गेली. मुंबईत ही पारा ३९ अंश सेल्सिअसवर गेल्याने उकाड्याने मुंबईकर हैराण झाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाल्याने उष्मघाताचे आजार वाढले. एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी चढा राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ४० अंश सेल्सिअस वर पारा जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सर्वाधिक तपासणी

राज्यात उष्माघाताचा पारा चढला असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २ लाख ५० हजार ८३२ लोकांची तपासणी करण्यात आली. यात सर्वाधिक ठाण्यात (४५,२९९), पालघर (३३,८५०), पुणे (२३,२३४), नागपूर (२२,७७२) आणि चंद्रपूर (२१,७७५) या जिल्ह्यांत तपासणी करण्यात आली.

वयोगटानुसार एकूण २,२८,४८६ प्रौढांची तर २२,३६४ लहान मुलांची तपासणी करण्यात आली आहे. पालघर -२, रायगड - १, नाशिक १, जळगाव - १ जणांना उष्मघाताचा त्रास झाला परंतु उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी

  • पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.

  • हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

  • उन्हात जाताना टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.

  • पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा.

  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नका

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.

  • कष्टाची कामे उन्हात करू नका.

  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

  • स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.

  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

logo
marathi.freepressjournal.in