राज्यात पाच दिवस मुसळधार; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, अलर्ट जारी

पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यात पाच दिवस अर्थात गुरूवारपर्यंत (दि.२१) अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अटलांटिक महासागरातून येणारे 'एरिन' नावाचे चक्रीवादळ देखील वेगाने पुढे सरकत आहे. हे वादळ पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यात पाच दिवस मुसळधार; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, अलर्ट जारी
Published on

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यात पाच दिवस अर्थात गुरूवारपर्यंत (दि.२१) अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणपट्टीत 'ऑरेंज अलर्ट' तसेच पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस दमदार पाऊस असेल, असेही त्यात म्हटले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा, तर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २० ऑगस्टदरम्यान ५० ते ६० प्रतिताशी किमी वेगाने वारे वाहणार असून मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहेत.

एरिन चक्रीवादळामुळे सात दिवस सतत पाऊस

अटलांटिक महासागरातून येणारे 'एरिन' नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे हवामान खात्याने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. हे वादळ पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये येत्या सात दिवसांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे. समुद्रात खोलवर घडणाऱ्या बदलांमुळे वाऱ्यांच्या दिशा अचानक बदलल्या असून, त्यांचा वेगही वाढला आहे. ही संकटाची पूर्वसूचना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in