अतिवृष्टीचा इशारा! राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी आज 'रेड अलर्ट'; मुंबई ठाण्यासह ६ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई, पुणे, ठाण्यासह कोकण, विदर्भातही पावसाचा तडाखा सुरू आहे. अनेक भागांत नदी, नाल्यांना पूर आला आहे.
अतिवृष्टीचा इशारा! राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी आज 'रेड अलर्ट'; मुंबई ठाण्यासह ६ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Published on

राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई, पुणे, ठाण्यासह कोकण, विदर्भातही संततधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांत नदी, नाल्यांना पूर आला आहे. धो धो बरसणाऱ्या पावसामुळे हवामान विभागाने आज (दि.२५) राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

रेड अलर्ट कुठे?

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

ऑरेंज अलर्ट कुठे?

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथा, वर्धा, नागपूर

यलो अलर्ट कुठे?

पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ

३-४ दिवस पावसाचा जोर कायम

राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत समुद्राला मोठी भरती, ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईतील समुद्राला शुक्रवारी आणि शनिवारी मोठी भरती येणार असून मोठमोठ्या लाटा उसळणार असल्याने भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बीएमसी प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in