बेस्ट ऑफ लक! आजपासून बारावीची परीक्षा,  गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना

बेस्ट ऑफ लक! आजपासून बारावीची परीक्षा, गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (बुधवार) सुरू

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (बुधवार) सुरू होणार आहे. परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, तर महामुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील.

बारावीची परीक्षा आज, २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूहकॉपी, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा देखील परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.

यंदा प्रात्यक्षिक परीक्षेचे ऑनलाईन गुणांकन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रनर अर्थात कस्टाेडियनला कस्टडीतून पेपर घेताना जीपीएस ऑन करायचे आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ शुटींग करावे लागणार आहे. रनर म्हणून खात्रीशीर व्यक्तीचीच नियुक्ती यंदा करण्यात आली आहे. परीक्षा काळात फिरणाऱ्या भरारी पथकातील सदस्यांना यंदा नवीन आयकार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पथकात वरीष्ठ शिक्षकांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in