
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज (दि.५) संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा राज्यात निकालाचा टक्का घसरला असून बारावीचे ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १.४९ टक्क्यांनी कमी झाले आहे. बोर्डाने सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपासून हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर, ६ मे पासून निकालाची प्रत महाविद्यालयात उपलब्ध होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा झाली होती. यंदा बारावीच्या विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात यंदाही राज्यातील मुलींनीच बाजी मारली. ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींचा ९४.५८ टक्के आणि मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९७.९९ टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे.
बघा विभागनिहाय निकाल
कोकण- ९६.७४ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
पुणे-९१.३२ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के
खालील वेबसाइट्सवर निकाल पाहता येतील
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org