२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल
२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल Photo : X (CMO Maharashtra)
Published on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल झाले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केलेल्या आदेशानुसार ​छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली नवी मुंबई येथे ‘जल जीवन मिशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

​कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली असून कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे पीएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तर अंकित यांची नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in