११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य प्रशासनात बदल्यांचे सत्र कायम

राज्य प्रशासनात बदल्यांचे सत्र कायम असून मंगळवारी ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदली आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रंजन महिवाल यांची बदली महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी झाली आहे.
११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य प्रशासनात बदल्यांचे सत्र कायम
Published on

मुंबई : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले रुचेश जयवंशी यांची नियुक्ती राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर नाशिक पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली जळगाव परिषदेच्या सीईओपदी झाली आहे.

राज्य प्रशासनात बदल्यांचे सत्र कायम असून मंगळवारी ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदली आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रंजन महिवाल यांची बदली महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी झाली आहे. श्वेता सिंघल यांची नियुक्ती नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. कान्हुराज बगाटे यांना सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण, कल्याण येथे नेमण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांची बदली महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे, तर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ गीतांजली बाविस्कर यांची बदली नियोजन विभागात सहसचिव म्हणून झाली. महावितरण, कल्याणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांची बदली पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिवपदी तर पंकज देवरेंची बदली बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in