नवभारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र ही गुरूकिल्ली; देवेंद्र फडणवीस

मुंबई विदयापीठात आयोजित समारंभात देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात आली.
नवभारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र ही गुरूकिल्ली; देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र येत्या २०३५ साली ७५ वर्षांचा होणार आहे. माझी नजर त्या महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्तीचे भवितव्य सुधारण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. २०३५ सालच्या ७५ वर्षांच्या महाराष्ट्राचे मानचित्र माझ्याडोळयासमोर आहे. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास कसा करता येईल याचे संशोधन आणि अभ्यास मी सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवभारत निर्मित करू इच्छित आहेत. महाराष्ट्र हीच त्याची गुरूकिल्ली आहे. महाराष्ट्राची ताकद व शक्ती संघटित केली तर महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकत नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जपानच्या कोयासान विदयापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कोयासान विदयापीठाच्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सन्मान देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मिळालेली ही उपाधी महाराष्ट्रातील जनतेच्या चरणी समर्पित केली.

मुंबई विदयापीठात आयोजित समारंभात देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात आली. कोयासान विदयापीठाचे प्राध्यापक तसेच मंत्रीमंडळातील सहकारी व लोकप्रतिनिधी मोठया प्रमाणात यावेळी उपस्थित होते. मला आनंद आहे की मी दिक्षाभूमीच्या शहरातून येतो असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोयासान विदयापीठ ज्या कुकाई यांनी बाराशे वर्षापुर्वी सुरू केले त्यांनी जपानमध्ये बुदधधम्माची स्थापना केली. कोयासान विदयापीठाला बुदधीस्ट स्टडीजच्या बाबत जगातील महत्वाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. तिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाचे अनावरण करण्याचीही संधी मला मिळाली. जपान, वाकायामा आणि महाराष्ट्राची मैत्री ही वेगळयाप्रकारची आहे. जपानने सातत्याने भारत आणि महाराष्ट्राला मदत केली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आज भारताचा अतिशय विश्वासाचा आणि जवळचा मित्र हा जपान आहे. हे बंध केवळ मैत्रीचे नाहीत तर संस्क़तीचेही बंध आहेत. भगवान गौतम बुदध आणि त्यांचे विचार हे या दोन देशांना कायम जवळ आणतात. जगाला युदध नको तर बुदध हवा हे विचार गौतम बुदधांनी दिले. गौतम बुदधांचा देशम्हणून भारतासह जपानकडे पाहिले जाते. पायाभूत सुविधा,औदयोगिक विकास सोबतच सामाजिक समताही आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात जपानचा मोठा सहभाग आहे. अंडरग्राउंड मेट्रोसाठी जपानच्या जायकाने २० हजार कोटी दिले. ट्रान्सहार्बरलिंक सुरू करण्याची संधी आपल्याला मिळाली. २२ किमीच्या या सागरी ब्रीज साठी जपानने १८ हजार कोटी दिले. बुलेटट्रेनसह इतरही प्रकल्पांसाठी जपानने मदत केली. वर्सोवा ते विरार ही सगळयात मोठी सिलिंक तयार करण्यासाठी जपानसोबत चर्चा झाली आहे . पायाभूत सुविधांचे कार्य महाराष्ट्रात २०१४ नंतर सुरू केले हे कार्य जेव्हा पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्याबाबत देशातील इतर राज्यांच्या पेक्षा खूप वरपर्यंत पोहोचला असेल, असेही फडणवीस म्हणाले.

"उपाधी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो"

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देशात सामाजिक आर्थिक समता तयार होणार नाही तोपर्यंत देश प्रगती करू शकणार नाही हे माहिती होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. वेगवेगळया समाजांना सोबत घेउन वंचित, दलित, आदिवासी, ओबीसी अशा सर्व समाजांसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपल्यालाही तेच करायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आशिर्वाद, सहकाऱ्यांची व वरिष्ठांची साथ सोबत होती म्हणून आपल्याला हा सन्मान मिळाला आहे. मला मिळालेली ही उपाधी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो असेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in