जंगल सफारीला पर्यटकांची पसंती; सहा वर्षांत वन विभागाच्या तिजोरीत १५० कोटींचा महसूल जमा

वाघ, बिबट्या याचे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगांचा थरकाप उडतो. परंतु प्रत्यक्षात जवळून वाघ, बिबट्या यांचा थरार पहावयाचा अनुभव औरच असतो. राज्यातील विविध जिल्ह्यांत जंगल सफारी असून गेल्या सहा वर्षांत १ कोटी ९ लाख ६० हजार ४ पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. यातून वन विभागाच्या तिजोरीत तब्बल १५८ कोटी ९७ लाख ६३ हजार ९४१ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जंगल सफारीला पर्यटकांची पसंती; सहा वर्षांत वन विभागाच्या तिजोरीत १५० कोटींचा महसूल जमा
Published on

मुंबई : वाघ, बिबट्या याचे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगांचा थरकाप उडतो. परंतु प्रत्यक्षात जवळून वाघ, बिबट्या यांचा थरार पहावयाचा अनुभव औरच असतो. राज्यातील विविध जिल्ह्यांत जंगल सफारी असून गेल्या सहा वर्षांत १ कोटी ९ लाख ६० हजार ४ पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. यातून वन विभागाच्या तिजोरीत तब्बल १५८ कोटी ९७ लाख ६३ हजार ९४१ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात ५२ हजार ३८६.३७ चौरस किलोमीटर म्हणजेच २०.१५ टक्के वन क्षेत्र उपलब्ध आहे. राज्यात वन विभागाच्या अखत्यारीत ५२ अभयारण्य असून चंद्रपूरमधील ताडोबा, गडचिरोली, मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी ठिकाणी जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध केल्यापासून पर्यटकांचा ओघ वाढला असून ऑनलाईन तिकीट बुकिंगला पर्यटक पसंती देतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, पुणे येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, सातारा जिल्ह्यातील चिपळूण व्याघ्र प्रकल्प अशा विविध ठिकाणी असलेल्या जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेट देत असतात. पर्यटकांच्या माध्यमातून वन विभागाच्या महसुलात वाढ होत असून पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

  • पर्यटक संख्या : १ कोटी ९ लाख ६० हजार ४

  • महसूल : १५८ कोटी ९७ लाख ६३ हजार ९४१

logo
marathi.freepressjournal.in