Maharastra Karnataka Border issue : महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला

कर्नाटकातील बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन आणि महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, पोलिसांनी नारायण गौडांसह अनेक कार्यकर्त्ये अटकेत
Maharastra Karnataka Border issue : महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला

महाराष्ट्र- कर्नाटकमधील सीमावाद (Maharastra Karnataka Border issue) आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा पुढे ढकलला असला तरीही सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचे समोर आले. बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या ५हुन अधिक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात केलेल्या या आंदोलनामुळे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरु आहे. यावेळी कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत हिरबागेवाडी टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. तिथे आलेल्या ५ हुन अधिक गाड्यांवर दगडफेक केली. तर कर्नाटक पोलिसांनी नारायण गौडांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तरीही, पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले आहे. काहींनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली. तसेच, काहीजण गाड्यांसमोर आडवे झाले होते. महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in