Belagavi : कर्नाटक सरकारची दडपशाही: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची अटक आणि सुटका

Belagavi : कर्नाटक सरकारची दडपशाही: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची अटक आणि सुटका

बेळगावमध्ये (Belagavi) महाराष्ट्र एकीककरण समितीचा मेळावा करण्यात आला होता, मात्र कर्नाटक सरकारने परवानगी न दिल्याने नेते, पदाधिकारी आक्रमक झाले.

कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून बेळगावमध्ये (Belagavi) सुरुवात झाली. याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीककरण समितीने बेळगावमध्येच मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आधी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना यामध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या मेळाव्याला ऐनवेळेस परवानगी नाकारली. तर, त्यानंतर सकाळी पोलिसांनी महाराष्ट्र एकीककरण समितीच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अटक करण्याचे सूत्र सुरु झाले. यामुळे बेळगावमध्ये वातावरण चांगलेच तापले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनादेखील बेळगावमध्ये प्रवेश करून दिला नाही.

कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी सोडून देण्यात आले. मात्र, कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. एवढंच नव्हे तर, नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांनाही रोखले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल आणि निपाणी सीमा हद्दीतील दूधगंगा पुलावर त्यांना अडवण्यात आले. यावेळी त्यांनी तिथे ठिय्या आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in