महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा काही दिवस राहणार बंद ; काय आहे कारण ?

कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी बससेवा काही वेळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा काही दिवस राहणार बंद ; काय आहे कारण ?
Published on

कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी बससेवा काही वेळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांनी तणाव कमी होईपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांना कर्नाटकच्या बसवर शाई फेकण्याची मागणी केली. त्यानंतर कलबुर्गी येथे महाराष्ट्र बसला काळे फासण्यात आले. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद केली आहे.

सांगलीतील जत तालुक्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपला दावा ठोकला. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही राज्यात वातावरण तापले आहे. सध्या बसेसच्या काचा फोडण्याच्या घटनांमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून नोकरी आणि उद्योगासाठी रोज ये-जा करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in