स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर

मुंबई महापालिकेने प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप ६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. तसेच ‘ड’ वर्गाच्या महापालिकांनी १३ ऑक्टोबरपर्यंत, तर नगर परिषदेच्या प्रभाग रचना अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर
Published on

मुंबई महापालिकेने प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप ६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. तसेच ‘ड’ वर्गाच्या महापालिकांनी १३ ऑक्टोबरपर्यंत, तर नगर परिषदेच्या प्रभाग रचना अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेने ११ ते १६ जूनदरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ व १८ जून रोजी प्राप्त जनगणनेची माहिती तपासणे, १९ जून ते ४ जुलै स्थळ पाहणी, ५ ते १० जुलै गुगल मॅपवर नकाशा तयार करणे, ११ ते २४ जुलै प्रभाग हद्दीवर जाऊन तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करणे, तर २२ ते २८ ऑगस्ट प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत.

तसेच २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, ९ ते १५ सप्टेंबरपर्यंत सुनावणीवरील शिफारशी प्राधिकृत अधिकाऱ्यांना अंतिम करुन नगरविकास विभागाला सादर करावेत. १६ ते २२ सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेला प्रभाग रचना प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करावेत. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अहवालास मान्यता द्यावी. ३ ते ६ ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी, असे सुधारित आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in