
छत्रपती संभाजीनगर : शासन व सर्वसामान्य जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन रम्मी जुगाराला आळा घालून, महाराष्ट्र राज्य लॉटरी पारदर्शकपणे चालवता येईल, ती बंद करण्याची गरज नाही. अनुभवी लॉटरी चालक, विक्रेते, त्यांच्या संघटना त्यासाठी राज्य शासनाला मदत करायला तयार आहेत, असे मराठवाडा लॉटरी विक्रेता, चालक संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हैसमाळे यांनी सांगितले.
सोशल मीडिया, टीव्ही अशा माध्यमातून ऑनलाइन रम्मी व काही जुगारांच्या जाहिरातींचा मारा सतत होत असतो. आमिषाला बळी पडून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, काहींनी आत्महत्या केल्या. या पार्श्वभूमीवर म्हैसमाळे म्हणाले, गोवा, सिक्कीम, मिझोराम, नागालँड आदी राज्यांतील लॉटरी महाराष्ट्रात चालविण्यासाठी काही जणांना कंत्राटे दिल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरी कमकुवत झाली. महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचवण्यासाठी, ती पारदर्शक, प्रामाणिकपणे चालविण्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक
समिती नुकतीच केरळ राज्याचा दौरा करून आली. या समितीने आमची अनुभवी मते विचारात घेतली, तर राज्य सरकारचा फायदाच होईल, असे ते बोलत होते.