लॉटरीतून उत्पन्नवाढीसाठी अभ्यास करणार; मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती 

महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू ठेवण्यासह उत्पन्नात वाढ करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १० जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
लॉटरीतून उत्पन्नवाढीसाठी अभ्यास करणार; मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती 
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू ठेवण्यासह उत्पन्नात वाढ करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १० जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ठाकरे, शिंदे सेनेसह शरद पवार व काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश समिती करण्यात आला आहे. केरळच्या लाॅटरीचा अभ्यासासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून पुढील एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. २०२३-२४ मध्ये तीन कोटी रुपयांहून अधिकचा तोटा झाला होता. लॉटरी बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली होती.  केरळमधील राज्य लॉटरी मोठ्या नफ्यात आहे. तेथील तसेच काही राज्यांमधील सरकारी लॉटऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महायुती व मविआ आमदारांची एक समितीची स्थापना करण्यात आली आहे.

अशी असेल समिती 

सुधीर मुनगंटीवार (भाजप) - अध्यक्ष,

अमित साटम (भाजप) - सदस्य

चंद्रकांत नरके (शिवसेना शिंदे गट) - सदस्य

विठ्ठल लंघे (शिवसेना शिंदे गट) - सदस्य,

चेतन तुपे (राष्ट्रवादी अजित पवार गट) - सदस्य,

शेखर निकम (राष्ट्रवादी अजित पवार गट) - सदस्य,

रोहित आर. आर. पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) - सदस्य,

सुनील प्रभू (शिवसेना ठाकरे गट) - सदस्य,

अमित देशमुख (कॉग्रेस) - सदस्य,

प्रेरणा देशभ्रतार, आयुक्त राज्य लॉटरी, वित्त विभाग - सदस्य सचिव

logo
marathi.freepressjournal.in