वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीकडे विद्यार्थ्यांची पाठ; तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा उपलब्ध

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी नुकतीच संपुष्टात आली. या फेरीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा उपलब्ध आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीकडे विद्यार्थ्यांची पाठ; तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा उपलब्ध
Published on

मुंबई : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी नुकतीच संपुष्टात आली. या फेरीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा उपलब्ध आहेत.

राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत ८ हजार १३८ जागांपैकी ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार २९० जागा रिक्त राहिल्या होत्या. दुसऱ्या फेरीपूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगांतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने राज्यामध्ये खासगी व सरकारी महाविद्यालयांतर्गत २०० जागांना मान्यता दिली. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार ४९० जागा उपलब्ध होत्या. ही फेरी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली.

४७० या फेरीत ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये ३८१ तर खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर प्रवेश मिळालेल्या ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ८६ तर खासगी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. ४६३ यादरम्यान ११ विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश रद्द केले. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमााच्या तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in