खिशाला कात्री! राज्यभरात दुधाची दरवाढ लागू; गायी-म्हशीचं दूध २ रुपयांनी महाग, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार?

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे.
खिशाला कात्री! राज्यभरात दुधाची दरवाढ लागू; गायी-म्हशीचं दूध २ रुपयांनी महाग, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार?
Published on

मुंबई : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे. राज्यात मंगळवारपासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन दरांमुळे खिशाला कात्री

डिझेलच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार यामुळे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गायीचे दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये, तर म्हशीचे दूध ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने दूध विक्री दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दुग्धजन्य पदार्थही महाग होणार?

दूध दरवाढीचा परिणाम केवळ पिशवीतील दूध खरेदीवर होणार नसून दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप, फ्लेवर्ड मिल्क आणि दुधापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in