
पुणे : यंदा महाराष्ट्रात सरासरी १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसाचा मोठा खंड असे हवामान राहणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यामध्ये पाच टक्के कमी अधिक तफावत आढळून येईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. साबळे म्हणाले, महाराष्ट्रासाठी २०२५ सालासाठी जून ते सप्टेंबर मॉन्सूनचा अंदाज वर्तवला आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे.
विदर्भात
अकोला १०५ टक्के, नागपूर आणि यवतमाळ १०० टक्के, शिंदेवाही (चंद्रपूर) येथे १०० टक्के
उत्तर महाराष्ट्रात
निफाड ११३ टक्के, धुळे १०० टक्के, जळगाव १०० टक्के
पश्चिम महाराष्ट्रात
कोल्हापूर १०१ टक्के, कराड १०८ टक्के, पाडेगाव ११५ टक्के, सोलापूर १०३ टक्के, राहुरी ११० टक्के, पुणे ११५ टक्के.
मराठवाडा विभागातील परभणी येथे ११० टक्के, कोकण विभाग दापोली १०६ टक्के