Maharashtra Monsoon Update : अधिकृतरित्या मान्सून परतला ; राज्यात मात्र पुढील पाच-सहा दिवस पाऊस सुरुच

Maharashtra Monsoon Update : अधिकृतरित्या मान्सून परतला ; राज्यात मात्र पुढील पाच-सहा दिवस पाऊस सुरुच

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरल्याने मुंबईकरांचं पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीसंकट टळलं आहे.

राज्यात 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून हळूहळू माघार परतण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. 30 सप्टेंबर रोजी देशात मान्सून अधिकृतपणे माघार घेईल, परंतु महाराष्ट्रात पाऊस सुरूच आहे आणि राज्यातील पावसाळा 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत हळूहळू संपेल अशी अपेक्षा असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अधिकृतपणे महाराष्ट्रात 1 जून रोजी सुरू होतो आणि साधारणपणे 30 सप्टेंबरपर्यंत टिकतो. महाराष्ट्रातील जवळपास 9 जिल्ह्यांत यंदा तुलनेने कमी पाऊस झाला आहे. कोकण-गोवा पट्ट्यात 18 टक्के पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 12 टक्के कमी, मराठवाड्यात 11 टक्के कमी, तर विदर्भात सरासरीपेक्षा 2 टक्के कमी पाऊस झाला आहे.

यंदा पुण्यात सरासरी पाऊस झाला असून पिंपरी-चिंचवडमध्ये 32 टक्के जास्त पाऊस झाला. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईने कोरडेपणाचा काळ अनुभवला असला तरी, शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी पुर्णपणे भरले आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबवरचं पाण संकट टळलं असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in