महापालिकांची प्रभागरचना तातडीने प्रसिद्ध करणार

राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पुणे व नवी मुंबई महापालिकांची प्रभागरचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
महापालिकांची प्रभागरचना तातडीने प्रसिद्ध करणार
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पुणे व नवी मुंबई महापालिकांची प्रभागरचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती सूचना मागवणे यासाठी २२ ते २८ ऑगस्टचा वेळ दिला आहे. काही महापालिकांचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव हे राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्याने प्रभाग रचना तातडीने प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम केले जाईल. त्यानंतर प्रभाग रचना आराखडा नगर विकास विभागाला पाठवला जाणार आहे. राज्यातील २९ मनपापैकी १० महापालिकांच्या प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. गट ‘ड’ च्या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.

मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, वसई-विरार, नवी मुंबई या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून राज्य निवडणूक आयोगांकडे प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश महापालिका प्रभाग रचना तातडीने प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून केला जाईल.

दरम्यान, 'ड' वर्गाच्या महापालिकांच्या प्रभाग रचना या 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in